Nigdi Crime : घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – समाजात दहशत पसरवण्यासाठी कोयता, पालघन असे घातक शस्त्र बाळगणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांनी सोमवारी (दि. 9) आकुर्डी येथे ही कारवाई केली.

अभिषेक तानाजी जगताप (वय 22, रा. बौद्धवस्ती, आकुर्डी), चॅक्या तलवार (रा. आकुर्डी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी केशव रावसाहेब चेपट यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिसांचे एका पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी दहशत पसरवण्यासाठी कोयता, पालघन घेऊन फिरत असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांची चाहूल पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अभिषेक आणि अल्पवयीन मुलास पाठलाग करून पकडले. तर, चॅक्या फरार झाला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III