Nigdi Crime : जबरदस्तीने मोबईल हिसकावणा-यास अटक

एमपीसी न्यूज – पादचारी नागरिकांचे मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणा-या एका चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी 29 सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्याच्या साथीदाराला 9 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांकडून 23 मोबईल फोन आणि एक दुचाकी जप्त केली आहे.

अक्षय उर्फ सोन्या संदीप चव्हाण (वय 21, रा. घरकुल, चिखली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. अक्षयचा साथीदार संजय गजानन मरगुरे (वय 19, रा. घरकुल, चिखली) याला यापूर्वी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट दोनचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मुंढे, अतिश कुडके यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 29 सप्टेंबर रोजी नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावून चोरी करणारा गुन्हेगार संजय मरगुरे याला गवळीमाथा येथून अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी करत पोलिसांनी तब्बल 23 मोबाईल फोन आणि एक पल्सर दुचाकी असा 3 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी संजय याने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून मोहननगर, जाधववाडी, मोशी, चिखली, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिंचवड, निगडी, रावेत या परिसरात मोबाईल फोन जबरदस्तीने चोरले असल्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलीस त्याच्या दुस-या साथीदाराचा शोध घेत होते. 9 सप्टेंबर रोजी पोलिसांनी संजयचा दुसरा साथीदार अक्षय याला देखील अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, सहाय्यक फौजदार दिलीप चौधरी, पोलीस हवालदार शिवानंद स्वामी, केरप्पा माने, दिपक खरात, वसंत खोमणे, उषा दळे, नामदेव कापसे, अतिश कुडके, शिवाजी मुंडे, अजित सानप, तांत्रिक विश्लेषण राजेंद्र शेट्टे, नागेश माळी या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.