Nigdi Crime News : महिलेच्या विनयभंग प्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भांडणात महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पिता-पुत्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे सोमवारी (दि. 12) दुपारी घडली.

भाऊसाहेब दशरथ पाटील (वय 49) आणि अजिंक्‍य भाऊसाहेब पाटील (वय 22, दोघेही रा. संभाजीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या पिता-पुत्राचे नाव आहे. याबाबत पिडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आरोपी सामाईक भिंतीस रंगकाम करीत होते. त्यावेळी फिर्यादी महिलेने आमच्या बाजूच्या भिंतीस रंग देऊ नका, असे पेंटरला सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपी यांनी ‘चल हड, तू कर रे पेंटींग, काय करते ही’, असे अपशब्द वापरले. आरोपी अजिंक्‍य याने महिलेकडे पाहून शिट्ट्या मारत गाणी म्हणत विचित्र हावभाव करून त्यांचा विनयभंग केला.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.