Nigdi crime News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यातच व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 27) पहाटे साडेपाच वाजता थरमॅक्स चौकातील एमएसईबी कार्यालयाच्या समोर घडली.

भगवान लक्ष्मण वाघमारे (वय 45, रा. थरमॅक्स चौक, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सुनील विजय वाघमारे (वय 31, रा. ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मयत मामा भगवान वाघमारे रविवारी पहाटे मॉर्निग वॉकसाठी गेले होते. पहाटे साडेपाच वाजता ते थरमॅक्स चौकातील एमएसईबीच्या कार्यालयासमोर आले असता एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली.

त्यामध्ये भगवान वाघमारे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक अपघाताची माहिती न देता तसेच जखमी वाघमारे यांना रुग्णालयात घेऊन न जाता तिथून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.