Nigdi Crime News : भक्ती शक्ती उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

एमपीसी न्यूज – भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी, दि. 30) सकाळी भक्ती शक्ती उड्डाणपूल, निगडी येथे घडला. याच पुलावर यापूर्वी सुद्धा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला होता.

अकबर अल्ली सिद्दीकी (वय 45, रा. रुपीनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सिद्दीकी त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 14 / सी झेड 8037) शुक्रवारी सकाळी रुपीनगर येथून आकुर्डीच्या दिशेने जात होते. निगडीमधील भक्ती शक्ती चौकात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने (जी जे 24 / एक्स 2082) जोरात धडक दिली.

यामध्ये सिद्दीकी ट्रकखाली आले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेचा पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

नव्याने बांधण्यात आलेल्या भक्ती शक्ती चौकातील या पुलावर अपघाताची ही दुसरी वेळ आहे. शहराचे आकर्षण ठरणाऱ्या या पुलावर वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने दोन अपघात झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.