Nigdi Accident News : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या टेम्पोने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 16 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता ट्रान्स्पोर्ट नगर, निगडी येथे घडली.

दिवाकर नागेंद्र शहा (वय 19) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत राहुल रामश धावडे (वय 42, रा. कोथरूड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टेम्पो (एम एच 14 / एफ टी 1809) घेऊन ट्रान्स्पोर्ट नगर, निगडी येथून जात होता. अप्पूघर कमान ते रायगड हॉटेल दरम्यान त्याने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दिवाकर गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

याबाबत 14 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.