Nigdi crime News : ओटास्किम गोळीबार प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी पायी फिरवले

एमपीसी न्यूज – ‘परिसरावर वर्चस्व कुणाचे’ या वादातून एका सराईत गुन्हेगाराने दुस-या गुन्हेगारावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी (दि.25) रात्री साडे अकराच्या सुमारास निगडीतील ओटास्किम येथे घडली होती. याप्रकरणातील आरोपींना निगडी पोलिसांनी आज (शनिवारी) घटनास्थळी पायी फिरवले.  दरम्यान, तपासानिमित्त आरोपींना घटनास्थळी नेल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोडमणी आणि खवले यांच्यात परिसरात वर्चस्व कुणाचे यावरून वाद सुरु होता. या वादातून किरण खवले या सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला. या गोळीबारात आकाश दोडमणी याच्या पायावर गोळी लागून तो जखमी झाला होता. तसेच, दोडमणी याचा भाऊ देखील जखमी झाला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

_MPC_DIR_MPU_II

घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस, गुन्हे शाखा व खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनीसुद्धा घटना स्थळी भेट दिली होती.

दरम्यान, या प्रकरणातील अटक केलेल्या चार आरोपींना आज (शनिवारी) निगडी पोलिसांनी घटनास्थळी पायी फिरवले. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले होते. गुन्हा कसा घडला, हत्यारे कुठे ठेवली आहेत, याबाबत त्यांच्याकडून माहिती घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.