Nigdi Crime News : अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; एक लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – अवैधरित्या देशी, विदेशी दारू आणि बिअरची वाहतूक करणा-या दोघांवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. त्यांच्याकडून 59 हजारांच्या दारूसह मोबाईल फोन आणि टेम्पो असा एकूण एक लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 14) निगडी येथे करण्यात आली.

अजय मच्छिन्द्र जाधव (वय 35, रा. आकुर्डी) आणि अन्य एकाच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी आकुर्डी येथे एक टेम्पो अवैधरित्या देशी, विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्यांची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली.

त्यात पोलिसांनी 50 हजार 123 रुपयांची देशी, विदेशी दारू आणि बिअरच्या 431 बाटल्या, सात हजारांचा मोबाईल फोन आणि 70 हजारांचा तीनचाकी टेम्पो (एम एच 12 / एस के 4596) असा एकूण एक लाख 36 हजार 123 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.