Nigdi Crime News : अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तिघांवर कारवाई; साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – अवैधरित्या वाळू (गौण खनिज) वाहतूक केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत डंपरसह 12 लाख 44 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी (दि. 23) रात्री केली.

नितीन गोरख वेताळ (वय 33, रा. मोहननगर, चिंचवड) आणि त्याचे इतर दोन साथीदार यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राधिकरण निगडी येथून एक डंपर अवैधरित्या वाळू घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास कै. विजय नाईकरे चौकाजवळ पोलिसांनी सापळा लावून एक डंपर (एम एच 12 / जी टी 8267) अडवला. त्यात पाहणी केली असता चार ब्रास वाळू आढळून आली.

_MPC_DIR_MPU_II

त्याबाबत चौकशी केली असता ही वाळू अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी 32 हजारांची चार ब्रास वाळू, 12 लाखांचा एक डंपर, 12 हजरांचा एक मोबाईल फोन आणि 710 रुपये रोख रक्कम असा एकूण 12 लाख 44 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

सामाजिक सुरक्षा विभागाने भोसरी येथील हॉटेल सर्जा येथे कारवाई करून 7 हजार 617 रुपयांची दारू जप्त केली आहे. तसेच हिंजवडी परिसरातील मारुंजी येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून 43 हजार 240 रुपयांना मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.