Nigdi Crime News : बस स्टॉपवर तरुणीचा विनयभंग करत मारहाण करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज -बस स्टॉपवर थांबलेल्या तरुणीचा विनयभंग करत तिला मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी ( Nigdi Crime News ) अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.2) निगडीतील टिळक चौक येथील बस स्टॉपवर घडली.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दशरथ मंगलसिंग साबळे (वय 26 रा.नांदेडगाव, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Pimpri Crime News : अल्पवयीन मुलीशी व आईशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बस स्टॉपवर थांबल्या असताना आरोपी तेथे आला व त्याने अचानकपणे फिर्यादीचा हात पकडून ओढले व त्यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच सिवीगाळ करत मारहाण देखील केली. माझ्या सोबत आली नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला सोडणार नाही ( Nigdi Crime News ) अशी धमकी दिली. यावरून निगडी पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.