Nigdi crime News : क्रिकेट खेळताना हाॅर्न वाजवल्याने दोघांवर तलवार व कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – क्रिकेट खेळत असताना दुचाकीवरून आलेल्या तरुणाने हाॅर्न वाजवल्याने लोखंडी कोयता व तलवारीने वार केले. निगडीतील ओटा स्कीम परिसरात बुधवारी (दि.25) ही घटना घडली.

याप्रकरणी आनंद वाले, राजू वाले आणि अमोल वाले (सर्व रा. सहयोग नगर, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय प्रकाश सोनवणे (वय 24, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र दुचाकीवरून ओटा स्कीम परिसरातून जात होते. त्याठिकाणी आरोपी क्रिकेट खेळत होते.

फिर्यादी यांनी दुचाकीचे हाॅर्न वाजवल्याने त्या रागातून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला लोखंडी कोयता व तलवारीने गंभीर दुखापत केली. तसेच, हातात कोयता व तलवारी घेऊन भागात दहशत निर्माण केली.

निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.