Nigdi Crime News : ‘प्रत्येक सणासुदीला माहेरहून सोन्याचा दागिना घेऊन ये’

सासरच्या लोकांची विवाहितेकडे अजब मागणी; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पतीला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून बारा लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्या मंडळींनी केली. तसेच प्रत्येक सणासुदीला माहेरहून काहीतरी सोन्याचा दागिना घेऊन ये, अशी देखील अजब मागणी सासरच्या मंडळींनी केली असल्याची फिर्याद विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पती दयानंद विष्णू बोबडे (वय 34), सासरे विष्णू अर्जुन बोबडे (वय 58), सासु शोभा विष्णू बोबडे (वय 53), दीर तात्यासाहेब विष्णू बोबडे (वय 32), जाऊ मोनाली तात्यासाहेब बोबडे (वय 21, सर्व रा. नेवरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत 24 वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

हा प्रकार 12 जानेवारी 2015 पासून 19 एप्रिल 2021 या कालावधीत प्राधिकरण- निगडी आणि माळशिरस तालुक्यातील नेवरे या गावात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेचे पती नोकरीसाठी बाहेर गेले असता सासरच्या लोकांनी विवाहितेला वाळीत टाकल्यासारखे वागवले. विनाकारण तिला घालून पाडून बोलून तसेच शारीरिक व मानसिक त्रास देऊन क्रूरतेची वागणूक दिली.

‘मला चार चाकी गाडी घ्यायची आहे. तर तू तुझ्या वडिलांकडून बारा लाख रुपये घेऊन ये’ असा दम देत पतीने विवाहितेला मारहाण केली. तसेच प्रत्येक सणासुदीला काहीतरी सोन्याचा दागिना घेऊन ये, असे म्हणून देखील दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.