Nigdi crime News : बेकायदेशीरपणे गोमांस विक्री करणाऱ्या दुकानदारासह दोन रिक्षा चालकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – उस्मानाबाद येथून आणलेले गोमांस निगडी परिसरातील मटण दुकानांमध्ये घेऊन जाणा-या दोन रिक्षा चालक आणि एका मटण विक्रेत्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मटण दुकानदार वसीम गौसमोद्दीन कुरेशी (वय 32), रिक्षा चालक राहुल अनिल कांबळे (वय 24, रा. ओटास्किम, निगडी), रिक्षा चालक अझर हमीद कुरेशी (वय 22, रा. खराळवाडी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मंगेश मछिंद्र नडे (वय 26, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद येथून एका पिकअप व्हॅनमध्ये गोमांस आणण्यात आले. त्यातून आरोपी वसीम याने त्याच्या दुकानात काही गोमांस ठेवले. तसेच काही गोमांस आरोपी राहुल आणि अझर यांनी त्यांच्या रिक्षामधून इतर मटण शॉपमध्ये विक्रीसाठी नेले. याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.