Nigdi Crime News : पैशांच्या कारणावरुन दोन गटात वाद; चाकूने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पैशांच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला. या वादात एका तरुणाच्या छातीत चाकू खुपसून त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शनिवारी (दि. 17) काळभोर चाळ, निगडी येथे घडली. याबाबत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गणेश राजेंद्र साळुंखे (वय 27, रा. दुर्गानगर, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राकेश बजरंग साळुंखे (वय 20), ओमकार बजरंग साळुंखे (वय 19), सोनी (वय 22), मोनिका (वय 19), कविता (वय 42, सर्व रा. काळभोरचाळ, दुर्गानगर, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

गणेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचे मोठे भाऊ राहुल यांनी चुलते बजरंग साळुंखे यांना उसने पैसे दिले होते. ते पैसे मागण्यासाठी फिर्यादी गेले असता त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला लोखंडी कोयता, राॅड आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली.

याच्या परस्पर विरोधात कविता बजरंग साळुंखे (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश राजेंद्र साळुंखे (वय 25), राहुल राजेंद्र साळुंखे (वय 32), सारिका राहुल साळुंखे (वय 28) आणि अन्य तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कविता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचा पुतण्या आरोपी गणेश याने पैशाच्या कारणावरून फिर्यादी यांचा मुलगा ओमकार याला लाकडी बांबूने डोक्यात मारून जखमी केले. दुसरा पुतण्या आरोपी राहुल याने फिर्यादी यांचा मुलगा राकेश याला जीवे मारण्याच्या उद्देशाने छातीत चाकू खुपसून गंभीर जखमी केले. तसेच अन्य आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला मारहाण केली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.