Nigdi Crime News : शिफ्टिंग करण्यासाठी दिलेल्या सामानाचा अपहार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – रावेत येथून हडपसर येथे शिफ्टिंग करण्यासाठी दिलेले सामान शिफ्ट न करता स्वतःकडे ठेऊन 70 हजारांच्या सामानाचा अपहार केला. ही घटना 18 मे 2020 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

अमित उर्फ नरेंद्र मोगा, राकेश कुमार उर्फ लीलाधर सिहाग (रा. उबाळेनगर, वाघोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अजय रमेश मनसुके (वय 40, रा. निगडी प्राधिकरण) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या घरातील सामान रायगड येथून रावेत आणि हडपसर येथे आणायचे होते. त्यासाठी त्यांनी मोगा मूव्हर्स पॅकर्स कंपनी ट्रान्सपोर्ट नगर, निगडी या कंपनीच्या आरोपी मालकासोबत संपर्क केला. आरोपींना 25 हजार रुपये दिले. कंपनीचे मॅनेजर आरोपी राजेश याने फिर्यादी यांचे घर सामान नागोठाणे रायगड येथून रावेत येथे शिफ्ट करण्यासाठी गाडी आणि पाच कामगार पाठवले. त्याद्वारे सामान रायगड येथून रावेत येथे आणले.

काही सामान हडपसर येथे न्यायचे असल्याने ते फिर्यादी यांनी आरोपींच्या गाडीत दिले. लाकडी कपाट, पलंग, गाडी हे 70 हजारांचे सामान स्वतःच्या ताब्यात ठेऊन आरोपींनी त्याचा अपहार केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.