Nigdi Crime News : सासऱ्याचे अश्लील चाळे, पती करायचा मानसिक छळ

विवाहितेच्या तक्रारीवरून सासरच्या चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सासरा अश्लील चाळे करायचा तर पती मानसिक त्रास देत होता. विवाहित महिलेनं याविरोधात पोलिसांत धाव घेत पती, सासरे व नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 01 फेब्रुवारी 2008 ते 27 ऑक्टोबर 2019 या कालावधीत आकुर्डी येथे घडला.

पीडित विवाहित महिलेनं याप्रकरणी शुक्रवारी (दि.16) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेचा पती स्वप्निल शाम मोकादम, सासरा शाम हरिभाऊ मोकादम, नणंद स्नेहल जितेंद्र चौधरी व नणंद सुजाता नरेंद्र रागिट यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती फिर्यादी महिलेला मानसिक त्रास देत होता. तसेच, घरात कुणी नसताना आरोपी सासरा फिर्यादी यांच्या बेडवर झोपून त्यांच्या कपड्यांसोबत अश्लील चाळे करत असे व फिर्यादी यांच्या अंगाला स्पर्श करीत असे. ही बाब पती व नणंद यांना सांगितली मात्र त्यांनी फिर्यादी महिलेलाच दोषी ठरवले.

तसेच, त्यांना व त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.