Nigdi Crime News : नावासह मेलचा गैरवापर करून पावणे पाच लाख परस्पर ट्रांसफर

एमपीसी न्यूज – नाव आणि मेलचा गैरवापर करून एका खातेधारकाने त्याच्या खात्यावर चार लाख 80 हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेतले. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती अधिकार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश केशवदास सचदेव (वय 49, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयसीआयसीआय बँकेच्या 187905500334 या खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खातेधारकाने अजय मोतीलाल रैना यांच्या नावाचा आणि मेलचा गैरवापर करून आरटीजीएसद्वारे चार लाख 80 हजार रुपये 187905500334 खाते क्रमांकावर पाठवण्यास फिर्यादी यांना सांगितले.

हा प्रकार 10 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच या कालावधीत चिंचवड एमआयडीसी येथे घडला आहे. याबाबत 5 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.