Nigdi Crime News : स्कूल बस मधील चार बॅटऱ्या चोरीला
एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या एका स्कूलबसमधून अज्ञात चोरट्यांनी चार बॅटऱ्या चोरून नेल्या. हा प्रकार 15 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत घडला.
शशिकांत भानुदास कदम (वय 44, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी ते चालवत असलेली स्कूल बस प्राधिकरण निगडी येथील एका मोकळ्या जागेत पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी स्कूल बसच्या गाडीचे वायरिंग कट करून बसमधील 46 हजार रुपये किमतीच्या चार बॅटऱ्या चोरून नेल्या. निगडी पोलीस तपास करीत आहेत.