Nigdi Crime News : मर्सिडीज बेंझ कारचे हप्ते थकवून कार मालकाची 50 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मर्सिडीज बेंझ कारची विक्री केल्यानंतर कारचे हप्ते थकवून मूळ मालकाची 50 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार प्राधिकरण निगडी येथे 15 सप्टेंबर 2018 पासून 18 ऑगस्ट 2020 या कालावधीत घडली.

रोहित शंकर काळभोर (वय 27, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळू उर्फ बाळासाहेब नाथू पारखी (रा. ओझर्डे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळभोर यांच्या मर्सिडीज बेंझ कारचा (एम एच 14 / एफ क्यू 7799) 15 सप्टेंबर 2018 रोजी 62 लाख रुपयांना विक्रीचा व्यवहार झाला. ती कार काळभोर यांनी आरोपी बाळू याच्या ताब्यात दिली. गाडीचा करारनामा झालेला असताना व्यवहार पूर्ण न करता काळभोर यांचा विश्वासघात केला. तसेच कारचे हप्ते न भरता 50 लाख 65 हजार 6 रुपये थकीत ठेऊन काळभोर यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

या प्रकरणात बाळासाहेब पारखी यांनी त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी याबाबत गुन्हा दाखल होण्यापूर्वी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी गाडीसाठी भरलेले पैसे आणि इतर बाबी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. फिर्यादी रोहित काळभोर यांच्या भावाचा विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्या मुलीसोबत साखरपुडा झाला आहे. त्याचा दबाव आणून आरोपींनी हा गुन्हा दाखल केल्याचे पारखी यांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.