Nigdi Crime News : ओट्यावरील गँगवॉर; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला डेक्कन पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – निगडी परिसरातील ओटास्कीम येथे एप्रिल महिन्यात झालेल्या गँगवॉरमध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात मागील एक महिन्यापासून फरार असलेल्या एका आरोपीला डेक्कन पोलिसांनी अटक केली.

अक्षय प्रकाश माने (वय 24, रा. पर्वती दर्शन, पुणे-सातारा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

निगडी परिसरातील ओटास्कीम येथे 19 आणि 20 एप्रिल रोजी गँगवॉर झाले. पहिल्या प्रकरणातील तरुणाचा खून झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यावर खुनी हल्ला केला. खुनी हल्ला झालेल्या तरुणाचा देखील सहा दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. शक्तिमान कांबळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

खून झाल्यानंतर आरोपी माने पसार झाला. तो डेक्कन नदीपात्रातीतल रस्त्यावर थांबला असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी माने याला सापळा लावून पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.