Nigdi Crime News : भरलेल्या सिलेंडर मधून गॅस चोरी; तरुणास अटक

एमपीसी न्यूज – भरलेल्या सिलेंडर मधून गॅस चोरी केल्याचा प्रकार ओटास्कीम निगडी येथे उघडकीस आला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाकडून पोलिसांनी 31 हजार 190 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 14) दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.

आकाश दयानंद माने (वय 23, रा. ओटास्कीम, निगडी. मूळ रा. लातूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई उमेश मोहिते यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील घरगुती आणि कमर्शियल भरलेल्या सिलेंडर मधून चार किलो वजनाच्या सिलेंडर मध्ये गॅस काढून गॅसची चोरी केली. ग्राहकांच्या सिलेंडरमधून गॅस काढून त्याने ग्राहकांची फसवणूक केली. हा प्रकार करत असताना त्याने कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली नाही. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता निगडी पोलिसांनी कारवाई करत तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 31 हजार 190 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.