Nigdi Crime News : मूल होत नसल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नामध्ये व्यवस्थित मानपान केला नाही, तसेच मूल होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याबाबत पती, सासू, दीर आणि नणंद अशा चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 मे 2015 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत विजापूर कर्नाटक येथे घडला.

पती अब्दुल हमीद मौला पिरजादे (वय 28, रा. महाबू सुभाली दर्गा जवळ, विजापूर, कर्नाटक), दीर मोहम्मद हनीफ पिरजादे, सासू आणि नणंद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने सोमवारी (दि. 2) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या लग्नानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून वेळोवेळी घरगुती कारणावरून तसेच लग्नामध्ये व्यवस्थित मानपान केला नाही, या कारणावरून माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव देऊन लग्न चांगले करून दिले नाही असे वारंवार सुनावले. विवाहितेला मुल होत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी मारहाण, शिवीगाळ करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. लग्नामध्ये माहेरकडून स्त्रीधन म्हणून दिलेले सोन्या-चांदीचे दागिने परत न देता दागिन्यांचा आरोपींनी अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.