Nigdi Crime News : अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ

एमपीसी न्यूज – अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना दारू विक्रेत्या व्यक्तीने शिवीगाळ केली. तसेच पोलिसांशी झोंबाझोंबी करून त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना गुरुवारी (दि. 22) दळवीनगर झोपडपट्टी, चिकन चौक, निगडी येथे घडली.

महादेव साहेबराव साठे (वय 32, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिकन चौक, ओटास्कीम निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या दारूविक्रेत्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अतिश कुडके यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, दळवीनगर झोपडपट्टी, चिकन चौक येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये एक व्यक्ती अवैधरित्या दारू विक्री करीत आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस आरोपीवर कारवाई करण्यासाठी गेले.

आरोपी महादेव साठे वीस लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असताना पोलिसांना आढळून आला. त्याच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी वाहनात बसवत असताना आरोपीने पोलिसांशी झोंबाझोंबी केली. तसेच पोलिसांना शिवीगाळ करून त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.