Nigdi Crime News : निगडी परिसरातील साहिल जगताप, बॉबी यादव टोळीवर मोक्का

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी निगडी परिसरातील साहिल जगताप आणि बॉबी यादव या दोन टोळ्यांवर मोक्काची (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999) कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी (दि. 15) दिले आहेत.

टोळी प्रमुख साहिल ऊर्फ खा-या तानाजी जगताप (वय 23, रा. बौद्ध नगर, आकुर्डी), रोहित हिंदुराव रकटे (वय 24, रा. इंदिरा पॅलेस दत्तवाडी आकुर्डी), शंकर लक्ष्मण दाते (वय 22, रा. बळवंत कॉलनी, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडगांव), सनी तायप्पा तलवार (वय 25, रा. शेख चाळ, गुरुदेवनगर, आकुर्डी), आशिष केशव सुर्वे (वय 22, रा. त्रिमुर्ती हाऊसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर, तळवडे), नितीन राजेश सोनवणे (वय 30, रा. चिंचवडे चाळ, चिंचवडगांव), सलमान ऊर्फ सलम्या अफजल खान (वय 24, रा. संघर्ष हाऊसिंग सोसायटी, ओटास्किम निगडी), कृष्णा इटकल, अबु तालीम शेख अशी साहिल जगताप टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

या टोळीविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, दुखापत व बेकायदेशीररित्या घातक शस्त्र जवळ बाळगणे, असे एकूण आठ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर व सातारा जिल्हा याठिकाणी दाखल आहेत. हे गुन्हेगार वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यावरून आरोपींच्या विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानुसार अपर आयुक्तांनी मोक्काच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.

टोळी प्रमुख बॉबी ऊर्फ सुरेश विलास यादव (वय 33, रा. आकुर्डी), सनी ऊर्फ प्रवीण बाबुलाल सरपट्टा (वय 29, रा. बबन पांढारकर चाळ, पंचतारानगर, आकुर्डी), प्रसाद ऊर्फ तांब्या लक्ष्मण सुतार (वय 26, रा. देवेंद्र अपार्टमेंट, पंचतारानगर, आकुर्डी), विकी पोपट वाघ (वय 26, रा. राहुल शिंदे बिल्डींग, पंचतारानगर, आकुर्डी), जिग्नेश परशुराम सावंत (वय 30, रा. शरदनगर कॉलनी, मोरेवस्ती, चिखली), नरेंद्र ऊर्फ गुंड्या बाबुलाल सरपट्टा (वय 27, रा. बबन पांढारकर चाळ, पंचतारानगर, आकुर्डी), कल्पेश संदिप पवार (वय 25, रा. पंचतारानगर, आकुर्डी) अशी मोक्काची कारवाई केलेल्या दुसऱ्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

टोळीतील सदस्यांच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, दरोडयाची पुर्वतयारी करणे, दुखापत करणे, दंगा करणे, घरफोडी करणे, मारामारी करणे, गृह आगळीक करणे, अपहरण करुन खून करणे, खूनाचा कट करणे व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे 14 गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर व सातारा जिल्हा याठिकाणी दाखल आहेत.

हे गुन्हेगार वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव निगडी पोलिसांनी सादर केला होता. त्याला मान्यता देत आरोपींवर मोक्काची कारवाई करण्याचे आदेश अपर आयुक्तांनी दिले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, उप आयुक्त (परिमंडळ एक) मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त (गुन्हे 2) श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली, पीसीबी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एन. धुमाळ, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पोलीस नाईक संदिप दानवे, निलेश चासकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.