Nigdi Crime News : दारूच्या नशेत चाकूने भोकसून एकाचा खून

एमपीसी न्यूज – दारूच्या नशेत एकाला चाकूने भोकसले. त्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी सहा वाजता ओटास्किम, निगडी येथे घडली.

दौलत शरमुद्दीन बागवान (वय 40, रा. ओटास्किम, निगडी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश तुकाराम शिंगे (वय 40, रा. ओटास्किम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मयत दौलत आणि त्यांचा मित्र राहुल नाटेकर (वय 26) हे दोघेजण ओटास्किम, निगडी येथे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी प्रकाश शिंगे दारू पिऊन तिथे आला. त्याने काहीही कारण नसताना घरगुती वापराच्या चाकूने दौलत यांना भोकसले.

यात दौलत गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना दौलत यांच्या फिर्यादीवरून प्रकाश शिंगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यात दौलत यांच्या पोटात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गुन्हा घडल्यानंतर आरोपी शिंगे पळून गेला आहे. दौलत यांच्या मृत्यूनंतर यात कलामवाढ काढून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.