Nigdi : भर दिवसा धमकी देत मजुराला लुटले

एमपीसी न्यूज – भर दिवसा धमकी देत तीन ईसमांनी एका मजुराला लुटले. ही घटना भक्ती-शक्ती चौकाजवळ निगडी येथे सायंकाळी सहा वाजता घडली.

प्रेम सुंदर मारवाडी (वय 18, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उभा असताना आरोपी दुचाकीवरुन तेथे आले व त्यांनी फिर्यादी यांना धमकी देत बाजूला चल असे सांगितले. यावेळी फिर्यादीला रोडच्या बाजूला नेले व तेथे फिर्यादीच्या खिशातली मोबाईल फोन व रोख दीड हजार रुपये असा एकूण 8 हजार 500 रुपयांचा एवज लुबाडून नेला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.