Nigdi crime News : पोलीस रेकोर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – पोलीस रेकोर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी, चार मोबईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

वीरेंद्र उर्फ बेद्या भोलेनाथ सोनी (वय 22, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), रवी नरसप्पा रेड्डी (वय 25, रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

निगडी पोलिसांनी गस्त घालत असताना आरोपी वीरेंद्र आणि रवी या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे चार मोबईल फोन आणि एक चोरीची दुचाकी आढळून आली.

पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून आणखी कसून चौकशी केली. त्यामध्ये पोलिसांनी दोघांकडून एकूण पाच दुचाकी आणि चार मोबईल फोन असा एकूण 3 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईमुळे निगडी पोलीस ठाण्यातील एक घरफोडी आणि दोन वाहन चोरीचे तसेच तळेगाव दाभाडे आणि चिंचवड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी गौरव अनिल सरोदे (वय 24, रा. बौद्धनगर, ओटास्कीम, निगडी) याला अटक करून त्याच्याकडून एक मोबईल फोन जप्त केला आहे.

आरोपी वीरेंद्र याच्यावर पाच घरफोडी आणि एक वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे. तर आरोपी रवी याच्यावर चिखली व लष्कर पोलीस ठाण्यात तीन वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, उपनिरीक्षक डी कोकाटे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, सतीश ढोले, शंकर बांगर, विलास केकाण, रमेश मावसकर, आत्मलिंग निंबाळकर, विनोद व्होनमाने, विजय बोडके, राहुल मिसाळ, तुषार गेंगजे, अमोल साळुंखे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.