BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : हॉटेलमध्ये टोळक्याचा राडा; पाच जणांविरोधात गुन्हा

645
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – यमुनानगर येथे टोळक्‍याने बेकायदेशीर जमाव जमवून हॉटेमध्ये दंगा घालत एकावर कोत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेसातच्या सुमारास हॉटेल चावडी येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रितम सुरेश हजारे (वय 29, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमर कसबे (वय 25, रा. निगडी), अमर उघडे (वय 25) व त्यांचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अमोल अहिरे हे दोघेजण हॉटेल चावडी येथे बोलत उभे होते. त्यावेळी आरोपींनी जमाव जमवून हॉटेल मालक व कामगारांना शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. फिर्यादी व आरोपी अमर यांच्यातही वादाला सुरुवात झाली. यावेळी अमर याने लोखंडी खुर्ची फिर्यादीच्या डोक्‍यात मारली व कसबे याने त्याच्या हातातील कोयता हजारे यांच्या डोक्‍यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.