Nigdi crime News : तरुणीची सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज – मॅट्रीमोनिअल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने आणि कस्टममधून बोलत असल्याचे सांगणाऱ्या एका महिलेने तरुणीची सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 4 ते 17 मे या कालावधीत उमांचल महिला हॉस्टेल, आकुर्डी येथे घडली.

डॉ. देव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), हमजा खोतामिरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीने गुरुवारी (दि. 10) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना लिंगायत मेट्रोमोनिअल साईटवरून एका अनोळखी व्यक्तीने मॅरेज रिक्वेस्ट पाठवली. फिर्यादी यांच्याशी लग्न करायचे आहे असे आरोपी डॉ. देव याने सांगितले. त्याने फिर्यादी यांच्यासाठी विदेशातून पार्सल पाठवल्याचे सांगितले.

त्यानंतर आरोपी हमजा हिने फिर्यादी यांना फोन करून डॉ. देव याने पाठवलेले पार्सल घेण्यासाठी आपण कस्टम विभाग दिल्ली येथून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून एक लाख 25 हजार 500 रुपये घेतले. पैसे घेऊनही फिर्यादी यांना पार्सल मिळाले नाही. त्यामुळे फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.