Nigdi Crime News : स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मालकास अटक, तीन मुलींची सुटका

एमपीसी न्यूज – स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवणा-या स्पा सेंटरवर निगडी पोलिसांनी छापा टाकून मालकाला अटक केली आहे. यातून तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. चिंचवडमधील अजिंठानगर येथे आज (शनिवार, दि.12) ही कारवाई करण्यात आली.

तानाजी उर्फ राजेश व्यकंट कानुरे (वय 32, रा. रुपीनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी स्पा मालकाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी अजिंठानगर येथे स्पा सेंटरच्या नावाखाली सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवत होता. याबाबत निगडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी स्पा सेंटरवर छापा टाकून मालकाला अटक केली व तीन पिडित मुलींची सुटका करण्यात आली.

ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र घनवट, पोलीस हवालदार सतीश ढोले, पोलीस हवालदार परवीन पठाण, पोलीस शिपाई विनोद व्हनमाने, सोपान बोदवड, दीपक जाधव यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.