Nigdi crime News : मनासारखे लग्न करून न दिल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – मनाप्रमाणे लग्न करून दिले नाही. तसेच लग्नातील साहित्य मनाप्रमाणे दिले नाही, व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणले नाहीत. या कारणांवरून पती आणि सासूने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

पती हारिस जावेद खान (वय 27), सासू शकिला जावेद खान (वय 45, दोघे रा. घरकुल, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी विवाहितेचा आणि आरोपी हारिस या दोघांचा विवाह सासरच्या लोकांच्या मनाप्रमाणे लाऊन दिला नाही. लग्नामध्ये दिलेले साहित्य सासरच्या लोकांच्या मनासारखे दिले नाही.

तसेच आरोपीला व्यवसाय करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणले नाहीत, या कारणांवरून आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ, मारहाण आणि टोचून बोलून शारीरक व मानसिक छळ केला.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.