Nigdi Crime News : निगडी खून प्रकरणातील  फरार आरोपीला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – ओटास्कीम -निगडी येथे खून करून पळून गेलेल्या आरोपींपैकी एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जनवाडी येथे एका बंद फ्लॅटमध्ये लपून बसलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले.

हेमंत उर्फ  साहिल आकाश खंडाळे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 19) रात्री किरकोळ कारणावरून एका टोळक्याने एका तरुणाच्या पोटात चॉपर खुपसून त्याचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर हे टोळके पळून गेले. त्यातील दोघेजण पुण्यातील जनवाडी येथे एका फ्लॅटमध्ये लपून बसले असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सोमवारी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.