Nigdi Crime News : ओटास्कीम येथील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – ओटास्कीम निगडी येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

दगडू सुभाष जाधव (वय 50, रा. वेताळनगर, चिंचवडगाव), परमेश्वर संभाजी कसाब (वय 43, रि. टॉवर लाईन निगडी), रामदास लक्ष्मण लष्करे (वय 37, रा. ओटास्कीम निगडी), राहुल राजू लष्करे (वय 30, रा. ओटास्कीम निगडी), संतोष भोजू लष्करे (वय 32, रा. ओटास्कीम निगडी), रमेश रंगनाथ देवकुळे (वय 48, रा. पाटीलनगर, पुणे), गौतम बबन साळवे (वय 32, रा. ओटास्कीम निगडी), चंद्रकांत शावराव शिंदे (वय 40, रा. ओटास्कीम निगडी), किशोर कुमार मौर्या (वय 42, रा. पाटीलनगर, चिखली), रफिक खान (वय 35), सोनू खान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक गणेश कारोटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका नावाचा जुगार खेळ सुरू केला. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी गुरुवारी दुपारी साडेपाच वाजता कारवाई करत अकरा जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये पोलिसांनी जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य चिठ्ठी, कार्बन, मोबाइल तसेच रोख रक्कम जप्त केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.