Nigdi crime news : बीआरटी बस थांब्यावर महिलेच्या पर्समधून मोबाईल फोन चोरला

एमपीसी न्यूज – बसची वाट पाहत थांबलेल्या एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल फोन चोरून (Mobile stolen) नेला. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी सव्वादहा वाजता पवळे ब्रिज, निगडी येथील बीआरटी बस स्टॉपवर( Nigdi BRT Bus Stop) घडली.

रुपाली विश्वास निकम (वय 31, रा. देहूगाव) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निकम रविवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास निगडी येथील पवळे ब्रिजजवळ असलेल्या बीआरटी बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने चार हजारांचा मोबाईल फोन लबाडीने चोरून नेला.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.