Nigdi crime News : बसची वाट पाहत थांबलेल्या तरुणाच्या हातातून तीन मोबईल हिसकावले

0

एमपीसी न्यूज – कंपनीत जाण्यासाठी कंपनीच्या बसची वाट पाहत थांबलेल्या तरुणाच्या हातातून एका चोरट्याने तीन मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि. 14) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भक्ती शक्ती चौक, निगडी येथे घडली.

प्रवीण पंडित वाळके (वय 29, रा. मोईगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सद्दाम जब्बार शेख (वय 26, रा. हरगुडे वस्ती, चिखली) या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कान्हे गाव येथील एका कंपनीत नोकरी करतात. ते सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कंपनीत जाण्यासाठी भक्ती शक्ती चौकातील बस थांब्याजवळ कंपनीच्या बसची वाट पाहत थांबले होते.

बस येण्यासाठी उशीर झाल्याने ते बसच्या चालकाला फोन करत होते. त्यावेळी त्यांनी हातात तिन्ही मोबईल ठेवले होते. आरोपी शेख याने तीनही मोबाईल जबरदस्तीने हिकावून चोरून नेले.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.