Nigdi crime news : पूर्ववैमनस्यातून तिघांवर वार; सात जणांवर गुन्हा दाखल

ही घटना बुधवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजता संजयनगर,ओटास्कीम येथे घडली.

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी मिळून तिघांवर कोयत्याने, पालघन, तलवार, पाईप आणि फायटरने बेदम मारहाण करत वार केले. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजता संजयनगर,ओटास्कीम येथे घडली.

हरनामसिंग कांचनसिंग जुन्नी (वय 21, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी), सातलिंग संगोळगी, मारुती धोत्रे अशी जखमींची नावे आहेत. जुन्नी यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी जाकीर उर्फ डॅन्या पठाण (वय 21), ऋतिक सकट (वय 20), बबल्या रणदिवे (वय 22), सचिन उर्फ सच्या जाधव (वय 19), अजय नाटेकर (वय 19), मुन्या शेख (वय 21), भावेश उर्फ भाव्या बाविस्कर (वय 18, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते.

त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी आपसात संगनमत करून बुधवारी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांवर हल्ला केला. पालघन, कोयता, फायटर, तलवार आणि लोखंडी पाईपने आरोपींनी तिघांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीत फिर्यादी यांच्या पाठीवर, सातलिंग यांच्या हातावर आणि मारुती याच्या ओठावर गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.