Nigdi crime News : चॉपरच्या धाकाने रिक्षा चालकाला लुटणा-या दोघांना बेड्या

एमपीसी न्यूज – चॉपरचा धाक दाखवून रिक्षा चालकाला लुटणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 13) रात्री अकरा वाजता निगडी येथील पीसीएमसी वसाहत येथे घडली.

सुनील पोपट गायकवाड (वय 24, रा. निगडी), अक्षय उर्फ गोट्या संजय छत्री (वय 26, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या दोन चोरट्यांची नावे आहेत.

याबाबत पियुष बापू चव्हाण (वय 20, रा. यमुनानगर, निगडी) यांनी बुधवारी (दि. 14) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे रिक्षा चालक आहेत. पीसीएमसी वसाहत येथे मंगळवारी रात्री अकरा वाजता आरोपींनी त्यांना चॉपरचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.