Nigdi crime News : निगडी, वाकड येथे घरासमोरुन दोन दुचाकी चोरल्या

एमपीसी न्यूज – निगडी आणि वाकड येथून अज्ञात चोरट्यांनी घरासमोरुन दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 8) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर विठ्ठल महाजन (वय 70, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाजन यांची 10 हजारांची हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

हा प्रकार 27 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

जावेद जहीर खान (वय 25, रा. काळेवाडी फाटा, ड्रायव्हर कॉलनी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खान यांची पाच हजारांची दुचाकी (एमएच 14 / एए 9960) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे.

हा प्रकार 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत घडला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.