Nigdi crime News : जुगार अड्ड्यावरील छाप्यात पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – अंकुश चौक, निगडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी एक लाख 72 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून 23 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई केलेल्या 23 जणांपैकी 21 जणांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली, तर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश चौकाजवळ गौतम शिंदे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. त्यात 23 जणांच्या विरोधात कारवाई करत 21 जणांना पोलिसांनी अटक करून त्यांना जामिनावर सोडले.

अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या कारवाईमध्ये 56 हजार 260 रुपयांची रोख रक्कम, एक लाखांचे 18 मोबाईल फोन, 16 हजार 100 रुपयांचे जुगाराचे साहित्य, असा एकूण एक लाख 72 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.