Nigdi Crime News : दुकानाची भिंत अंगावर कोसळल्याने महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुकानाचे रिनोव्हेशनचे काम सुरु असताना दुकानाची भिंत अंगावर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 15) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास निगडी येथील इन्स्पिरिया कमर्शियल प्रिमायसेस येथील शॉप क्रमांक एफ/19 येथे घडली.

लता कमलेश यादव (वय 28) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी टोमनसिंग बिसरूराम यादव (वय 25, रा. देहूगाव) यांनी शनिवारी (दि. 16) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रंगन्ना धरमन्ना (वय 50, रा. किवळे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील इन्स्पिरिया कमर्शियल प्रिमायसेस येथील शॉप क्रमांक एफ / 19 चे रिनोव्हेशनचे काम सुरु आहे. हे काम आरोपीने घेतले आहे. शॉपचा मुख्य दरवाजा काढला असताना त्याच्यावर अर्धवट भिंत राहिली होती. त्या भिंतीला कोणताही आधार नव्हता. त्यामुळे ती भिंत कोसळली.

या भिंतीखाली मयत महिला लता या होत्या. त्यामध्ये लता गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी ठेकेदाराने सुरक्षा साधने न पुरवता हलगर्जी केल्याबाबत गुन्हा दाखल करून आरोपी ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.