Nigdi Crime News : प्राधिकरणातील बंगल्यातून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण परिसरातील अन्नपूर्णा या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. बंगल्यातून चोरट्यांनी पाच लाख 41 हजार रुपयांचे दागिने, रोख रक्कम आणि कॅमेरा चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली आहे.

दिलीप रामकृष्ण अनगोळकर (वय 64, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अन्नपूर्णा बंगला सोमवारी दुपारी चार ते मंगळवारी सकाळी सहा या कालावधीत कुलूप लावून बंद होता. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

बेडरूममधील लाकडी वॉर्डरोबमधील तिजोरीचे लॉक उचकटून पाच लाख 41 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, कॅनन कंपनीचा कॅमेरा असा ऐवज चोरून नेला.

तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.