Nigdi crime News : मध्यवर्ती रोपवाटिकेतून चोरली चंदनाची पाच झाडे

0

एमपीसी न्यूज – निगडी येथील मध्यवर्ती रोपवाटीकेतून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची पाच झाडे चोरून नेली आहेत. हा प्रकार गुरुवारी (दि. 15) मध्यरात्री दोन वाजता घडला.

गणपत नारायण खुळे (वय 58, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. 16) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील मध्यवर्ती रोपवाटीकेतून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास 40 हजार रुपये किमतीची पाच चंदनाची झाडे चोरून नेली. झाडांच्या फांद्या रोपवाटिकेतच टाकून दिल्या असून चंदनाच्या झाडांचा केवळ गाभा चोरट्यांनी चोरून नेला आहे.

चंदनाच्या झाडांचा गाभा मोठ्या किमतीला विकला जातो. त्यासाठी अज्ञात चोरट्यांनी हा प्रकार केला असल्याचा पोलिसांना संशय आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.