Nigdi crime News : जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग; एकाला अटक

पीडितेसह त्यांच्या पतीला आरोपीने शिवीगाळ केली. तसेच पतीला 'तुला मारून टाकतो' अशी धमकी दिली.

एमपीसी न्यूज – महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच पीडित महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री दहा वाजता ओटास्कीम निगडी येथे घडली.

संतोष उर्फ सावळ्या शाम खुडे (वय 33, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पिडीत महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहा वाजता आरोपी संतोष हा फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने पीडित महिलेशी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला.

पीडितेसह त्यांच्या पतीला आरोपीने शिवीगाळ केली. तसेच पतीला ‘तुला मारून टाकतो’ अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.