Nigdi Crime News : पादचारी शिक्षिकेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 13) सायंकाळी यमुनानगर, निगडी येथे घडली.

छाया गुरूराज हब्बु (वय 55, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 13) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी छाया या शिक्षिका आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास त्या रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 45 हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.