Nigdi Crime : निगडी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – निगडी पोलिसांनी ओटास्कीम निगडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 7 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सात जणांवर गुन्हा दाखल केला. तर त्यातील पाच जणांना अटक केली आहे.

गौसपाक रसूल शेख (वय 48, रा. ओटास्कीम, निगडी), भीमा व्यंकप्पा धोत्रे (वय 28, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी), हसन सुभराती शेख (वय 42, रा. बैठी चाळ, ओटास्कीम, निगडी), हर्षद बाबू मोमीन (वय 22, रा. सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, ओटास्कीम निगडी), गोवर्धन घनश्यामदास धलनेजा (वय 55, रा. पिंपरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह महंमद कोरबू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), युसुफ कोरबू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस शिपाई उमेश किशोर मोहिते यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युसुफ कोरबू याने त्याच्या घरात जुगाराचा अड्डा सुरु केला होता. तो 52 पत्त्याच्या पानावर पैसे लाऊन तीरट नावाचा जुगार चालवत होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.

पोलिसांनी सोमवारी (दि. 19) दुपारी सव्वाचार वाजता घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 7 हजार 200 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले. तसेच पाच जणांना अटक केली. आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 4, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III