Nigdi Crime : रामबाग उद्यानातून चंदनाच्या झाडाचे खोड चोरीला

एमपीसी न्यूज – प्राधिकरण निगडी येथील रामबाग उद्यानातून अनोळखी चार जणांनी मिळून चंदनाच्या झाडाचे खोड कापून चोरी करून नेले. ही घटना 22 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजता घडली.

सखाराम बबन कोळप (वय 48, रा. प्राधिकरण निगडी. मूळ रा. पोकरी, ता. आंबेगाव, पुणे) यांनी याबाबत शनिवारी (दि. 31) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राधिकरण निगडी येथे रामबाग उद्यान आहे. त्या उद्यानात फिर्यादी कोळप हे माळीकाम करतात. 22 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजता अनोळखी चार चोरट्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी रामबाग उद्यानातून तीन हजार रुपये किमतीचे चंदनाचे खोड कापून चोरी करून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

15 ऑक्टोबर रोजी निगडी येथील मध्यवर्ती रोपवाटीकेतून अज्ञात चोरट्यांनी पाच चंदनाची झाडे चोरून नेली होती. त्यानंतर आठवड्याभरात हा प्रकार घडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.