गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Nigdi Crime : धक्कादायक! तरुणीचे भर दिवसा कपडे फाडून विनयभंग; महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

एमपीसी न्यूज – निगडी (Nigdi Crime) येथील गंगानगर परिसरात भर दिवसा एका 27 वर्षीय तरुणीचा पाठलाग करुन एका टोळक्याने तिच्या डोळ्यात मिर्ची टाकून तिचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.22) सकाळी साडे अकरा ते दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी पीडितेच्या मोठ्या बहिणीने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी चेतन मारूती (वय 31 रा. औंध गाव) याला अटक केली असून त्याचे तीन साथीदार मात्र अद्याप फरार आहेत.

Hinjawadi : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पत्नीच्या प्रियकराविरोधात गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 27 वर्षीय बहीणी या निगडीतील (Nigdi Crime) बेल्हेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन येत असताना रोडच्या कडेला मक्याचे कणीस घेण्यासाठी थांबल्या. यावेळी त्यांना पाठीमागून कोणी तरी इसम हे दुचाकीवरून येवून काढ रे काढ कोयता आज हिच्यावर वारच करू अशी धमकी दिल्याचे ऐकू आले. तशी ती तरूणी पळाली असता आरोपी टोळक्याने तिचा पाठलाग केला. ती घाबरून जवळ्च्या सुलभ शौचालयात गेली.

मात्र आरोपी तेथे आले व त्यांनी तिच्या अंगावर दारू ओतली व तिला मिर्ची पावडर खाऊ घालत, डोळ्यात मिर्ची पावडर टाकली. तसेच तिच्या हातावर ब्लेडने वार करून तिचे सर्व कपडे फाडले व निघून गेले. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, भरदिवसा एक टोळके तरूणीचा पाठलाग करून तिचा असा विनयभंग करतात? यामुळे शहरातील महिलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

spot_img
Latest news
Related news