Nigdi Crime : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – मोर्निंग वॉकसाठी पतीसोबत गेलेल्या वृद्ध महिलेने मंगलसूत्र दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी साडेसहा वाजता प्राधिकरण, निगडी येथे घडली.

मंजू मांगीलाल सिसोदिया (वय 61, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 4) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती बुधवारी सकाळी साडेसहा वाजता प्राधिकरण निगडी येथे मोर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घाल्यातील 30 हजार रुपये किमतीचे 17 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.