Nigdi Crime : अल्पवयीन मुले मौजमजेसाठी चोरायचे सायकल; तीन मुलांकडून 15 सायकल जप्त

एमपीसी न्यूज – तीन अल्पवयीन मुले मौजमजेसाठी निगडी प्राधिकरण परिसरात सायकल चोरी करत होते. निगडी पोलिसांना सायकल चोरणा-या या तीन मुलांना पकडले असून त्यांच्याकडून 15 सायकल जप्त केल्या आहेत.

तर दुसऱ्या कारवाईमध्ये निगडी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक करून 7 मोबाईल फोन आणि 5 दुचाकी जप्त केल्या आहेत. निगडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई होनमाने यांना माहिती मिळाली की, प्राधिकरण अग्निशमन कार्यालयाजवळ काही मुले सायकलवरून फिरत आहेत. त्यांच्याकडे असलेली सायकल चोरीची आहे.

माहितीनुसार पोलिसांनी खात्री करून तीन मुलांना सायकलसह ताब्यात घेतले आणि सायकलबाबत विचारपूस केली. मुलांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर मोरेवस्ती, निगडी, साने चौक आणि परिसरातून सायकल चोरी केल्याचे सांगितले. मौजमजा करण्यासाठी आपण सायकल चोरी करत असल्याची कबुली मुलांनी दिली आहे. तीन मुलांकडून एक लाखाच्या 15 सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या कारवाईमध्ये निगडी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम उर्फ चिम्या शिवदास पवार याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी सात मोबाईल फोन आणि पाच दुचाकी असा एकूण 2 लाख 8 हजार रुपयांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर आयुक्त रामनाथे पोकळे, उप आयुक्त मंचक इंप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, उपनिरीक्षक केरबा माकणे, कर्मचारी किशोर पढेर, सतिश ढोले, शंकर बांगर, विलास केकाण, रमेश मावसकर, विनोद होनमाने, विजय बोडके, भुपेंद्र चौधरी, राहुल मिसाळ, अमोल साळुंखे, दीपक जाधवर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.