Nigdi Crime : यमुनानगर येथील बंगल्यात 68 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज – यमुनानगर येथील सावली बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून एलसीडी टीव्ही, चांदीच्या ट्रॉफी, भांडी, नळ, कागदपत्रे असा 68 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी दहा वाजता उघडकीस आली.

राजेंद्र पद्माकर विसपुते (वय 54, रा. नवी मुंबई) यांनी याबाबत शनिवारी (दि. 7) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विसपुते यांचा यमुनानगर येथील सावली बंगला 5 मार्च ते 7 नोवेंबर या कालावधीत कुलूप लाऊन बंद होता. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील लोखंडी ग्रीलचा दरवाजा उचकटून आणि लाकडी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला.

बंगल्यातून चोरट्यांनी एलसीडी टीव्ही, चांदीच्या 40 ट्रॉफी, स्वयंपाक घरातील भांडी, नळ, शॉवर, चार्जर, कागदपत्रे, दस्त असा एकूण 68 हजारांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.